डोंबिवली – डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यासह कुटुंबीयांच्या बेनामी मालमत्तेची सक्तवसुली संचनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी रविवारी येथे केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बेनामी मालमत्ते संदर्भात तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली.डोंबिवलीतील भाजप पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात राजकीय दबावातून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात वरिष्ठ निरीक्षक बागडे यांनी पुढाकार घेतल्याने भाजप विरुद्ध बागडे असा वाद गेल्या आठवड्यापासून डोंबिवलीत रंगला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका नेत्याचे वरिष्ठ निरीक्षक बागडे हे खास समर्थक मानले जातात. त्यामुळे शिवसेना आणि भाजप असाही वाद त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

जोशी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. बागडे यांनी खोटा गुन्हा दाखल करून भाजप आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याने त्यांच्या विरुद्ध भाजपा आक्रमक झाला आहे.भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे ५० ते ६० कोटीची बेनामी मालमत्ता रविवारी डोंबिवली पूर्व मंडल भाजप कार्यालयात माध्यमांसमोर उघड केली. याहून अधिक मालमत्ता असण्याची शक्यता भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी व्यक्त केली.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट

हेही वाचा >>>डोंबिवलीत बनावट आधारकार्डच्या आधारे सीमकार्ड विक्री करणाऱ्या महिलेला अटक

नाशिक, सिन्नर, नवी मुंबई, ठाणे, इगतपुरी, सिन्नर, देवळाली या ठिकाणी बागडे आणि कुटुंबीयांच्या मालमत्ता असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी आमची इडी, सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागणी असणार आहे, असे करंजुले यांनी सांगितले. अशी प्रकरणे मार्गी लावली नाही तर प्रत्येक पोलीस अधिकारी तक्रारदाराचा खिसा खाली करेल. अशा प्रकरणांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे करंजुले यांनी सांगितले.

हेही वाचा >>>डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांचे निधन

चौकशी यंत्रणांकडे बागडे यांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आम्ही दिली आहे. विहित नमुन्यांमध्ये ही माहिती सादर करण्याची सूचना तपास यंत्रणांनी आम्हाला केली आहे, असे करंजुले यांनी स्पष्ट केले.बागडे यांच्याविरुद्ध शंभरहून अधिक तक्रारी वरिष्ठांकडे दाखल आहेत. राजकीय दबावपोटी त्याची दखल घेतली जात नसल्याचे करंजुले यांनी स्पष्ट केले. बागडे यांची चौकशी लावून शिवसेनेच्या जिल्ह्यातील एका नेत्याला खिंडीत गाठण्याचा प्रकार भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक राहुल दामले, कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब उपस्थित होते.

Story img Loader