लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या नावे विरोधक धृवीकरण करून समाजात वादंग निर्माण करीत असल्याचा आरोप करत तुष्टीकरणविना भाजप सर्वाना समान न्याय देत असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. मोदी सरकारने लोकांना आस्थेचा मार्ग दाखवला, तर काँग्रेसने प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरच आक्षेप नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले.

देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी जेव्हापासून आले, तेव्हापासून देशातुन आतंकवाद जवळपास संपला आहे. गेल्या १० वर्षात ‘ सबका साथ, सबका विकास ‘ हे सुत्र अवलंबुन देशाला प्रगतीच्या वाटेवर नेले आहे.किंबहुना गुलामगीरीची सारी चिन्हे नष्ट करून देशाला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत बनवुन संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढवण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असा दावा मंत्री सत्यपाल सिंग यांनी सांगितले.

आणखी वाचा-प्रचारापूर्वी भविष्यातील निवडणुकीचा विचार करा, नाराज शिवसेना नेत्याचा स्वपक्षीयांना सल्ला

एकीकडे जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या नावे विरोधक धृवीकरण करून समाजात वादंग निर्माण करीत आहेत. तर दुसरीकडे तुष्टीकरण न करता भाजप सर्वाना समान न्याय देत आहे. मोदी सरकारने लोकांना आस्थेचा मार्ग दाखवला, तर काँग्रेसने प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरच आक्षेप नोंदवला, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-Jitendra Awhad : “…मग मुनगंटीवार का पडले?” व्होट जिहादच्या दाव्यांवरून आव्हाडांचा फडणवीसांना खोचक प्रश्न

केंद्राने देशातील ८० कोटी जनतेला मोफत शिधा देण्याबरोबरच विविध योजना यशस्वीपणे राबवल्या. तरी, लोकसभेच्या वेळेस मविआ आघाडीने फेक नॅरेटीव्ह पसरवुन यश मिळवले. पण आता आघाडीच्या या खोट्याचा पर्दाफाश झाला असुन लोक आता त्यांच्या बतावणीला भुलणार नाहीत. कारण जनतेला विकास हवा आहे, राज्यात भाजप, महायुती सरकारने लाडकी बहिण योजना असो वा गरीब कल्याणाच्या अन्य योजनांच्या माध्यमातुन महिलांचा सन्मान केला. महाराष्ट्रात ८५० कोटी सायबर क्राईमच्या सुरक्षेसाठी तरतुद केली. तेव्हा, आत्मनिर्भर आणि पुर्णविकसीत महाराष्ट्र बनण्यासाठी महायुतीला साथ द्या. असे आवाहन त्यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp dispenses justice without appeasement while opposition creates controversy in society claims satya pal singh mrj