गेल्या काही महिन्यांपासून ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा काढला होता. महापालिकेवर अनेक वर्षे सत्ता असूनही शिवसेना पाण्याची समस्या सोडवू शकलेली नसल्याचा आरोप करत भाजपाने मडकी फोडून तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन कोपरीकरांना समान आणि मुबलक पाणी देण्याची मागणी केली. त्यावर येत्या आठवडाभरात मुंबई महापालिकेकडून ६ दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळवून त्याचे कोपरी भागात वितरण करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ.शर्मा यांनी दिले.

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरामध्ये विविध कारणांमुळे पाणी टंचाई भेडसावत आहे. कोपरी येथील शांतीनगर भागात जलकुंभ असून यातून सिद्धार्थ नगर, शांतीनगर, आनंदनगर, या भागात पाणूी पुरवठा होतो. असे असताना माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जलवाहिनीवर वॉल्व्ह बसवून त्याद्वारे हे पाणी परस्पर आनंदनगर भागात वळविल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला होता. महापौर म्हस्के यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सर्वच भागांना समान पाणी वाटप करण्याबरोबरच शेवटच्या टोकावरील वसाहतींपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी पालिकेच्यावतीने वॉल्व्हचे नियोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. यावरून शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला असतानाच शुक्रवारी भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी पालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या मोर्चाला आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह भाजप महिला शहराध्यक्ष मृणाल पेंडसे या उपस्थित होत्या. या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या. महापालिकेसमोर मडकी फोडून आंदोलकांनी महापालिकेचा निषेध व्यक्त केला.

municipal corporation began inspecting unauthorized private ro projects bottling contaminated water to prevent gbs
पिंपरीतील १७ ‘आरओ’ प्रकल्पाला टाळे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
pimpri ro water purifier projects
पिंपरीतील ‘आरओ’ प्रकल्पावर नियंत्रण कोणाचे? अन्न व औषध प्रशासन विभाग, महापालिकेने जबाबदारी नाकारली
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
BMC Budget 2025 Live Updates
कचरा संकलन शुल्काचा मुंबईकरांवर भार? महापालिकेचा आज अर्थसंकल्प
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी

“ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला नाही. आता निवडणूका जवळ आल्याने त्यांची धावपळ सुरू असून त्यासाठी पाणी पळवापळवीचे प्रकार केले जात आहेत. सत्ताधारी पक्षाचा प्रथम नागरिक जिथे राहतो. तो अशाप्रकारे नागिरकांवर अन्याय करत असेल तर ही बाबच संतापजनक आहे.” असं भाजपा आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.

Story img Loader