कल्याण : भाजप कल्याण पश्चिम मंडलाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक वरूण पाटील यांची कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी प्रदेश नेत्यांच्या आदेशावरून मंगळवारी भाजपमधून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द उमेदवारी अर्ज भरलेल्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे आवाहन भाजपच्या प्रदेश नेत्यांनी करूनही वरूण पाटील यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरुध्द भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांनी पवार यांची समजूत काढून त्यांना समझदारीचा सल्ला दिला. वरिष्ठांचा हा आदेश शिरसावंद्य मानून पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महायुतीचे विश्वनाथ भोईर यांचा जोमाने प्रचार करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांना दिले. अशाच पध्दतीने वरूण पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केल्याचे समजते. पण त्याला वरूण पाटील यांनी दाद दिली नसल्याचे समजते. वरूण पाटील माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे नातेवाईक आहेत.
हेही वाचा : नजीब मुल्ला तुम्ही देखील ‘जय श्री राम’ बोला
कपील पाटील केंद्रीय मंत्री असताना वरूण पाटील यांना कल्याण भाजपमध्ये मानाचे स्थान होते. पाटील यांच्या पाठबळामुळे वरूण पाटील यांनी काही महिन्यांपासून कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातून पाटील समर्थकांची त्यांच्या पक्षातील विरोधकांनी नियोजनाने कोंडी करून त्यांची पिछेहाट केली. मुरबाडमध्ये हे चित्र ठळकपणे पाहण्यास मिळते.
वरूण पाटील कल्याण डोंबिवली पालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक होते. या कारवाईमुळे आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळताना मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. कल्याणमधील एका उभरत्या नेतृत्वावर भाजपने कारवाई केल्याने वरूण पाटील समर्थक नाराज झाले आहेत. पाटील ही नाराजी विधानसभा निवडणुकीत कशापध्दतीने व्यक्त करतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. आधारवाडी परिसरावर पाटील यांची हुकमत आहे.