डोंबिवली – लोकसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा झाला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी विविध चाली खेळून मताधिक्य प्राप्त केले आहे. हे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून मिळविले आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.

हेही वाचा – स्टेज शो करण्याच्या नावाखाली महिलेला डान्सबारच्या कामात ढकलले, पोलिसांच्या मदतीने महिलेची दुबईतून सुखरूप सुटका

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्यघटनेप्रमाणे निर्णय दिला असता तर शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच राहिली असती. राज्यात भाजपचे ईव्हीएम यंत्र सरकार स्थापन झाले नसते आणि आताचा ईव्हीएम यंत्र घोटाळा झाला नसता, असा टोला माजी खासदार राऊत यांनी लगावला. निकाल न देण्याची न्यायालयाची अशीच परिस्थिती राहिली तर बांगलादेश, श्रीलंकेप्रमाणे महाराष्ट्रातही अराजक माजल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

आता ईव्हीएम यंत्र जागरुकतेची मोहीम मारकडवाडीतून सुरू झाली आहे. येत्या काळात ईव्हीएम यंत्राचा सोक्षमोक्ष लावावा लागेल. चोरीचे राज्य फार काळ टिकत नाही. एक दिवस तरी देशात ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावेच लागेल. लोकजागृतीमधून हे शक्य होणार आहे, असेही ते म्हणाले. आपण कागदाच्या माध्यमातून हरलो असलो तरी लोकमानसात आपलाच पक्ष जिंकला आहे. त्यामुळे नाऊमेद न होता आता नव्या जोमाने कामाला लागा. येत्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपले उमेदवार आपण भरघोस मतांनी निवडून आणू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा – उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

भाजपने केलेल्या खोटारडेपणामुळे आपण निवडणुकीत हरलो आहोत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हार जीत होतच असते. अशा संकटांवर मात करून लढणारा तो शिवसैनिक ओळखला जातो, हे आपण विसरू नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा भगवा फडकावयाचा आहे, असे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांनी शिवसैनिकांना सांगितले.