भाजपच्या प्रचारासाठी स्वत: रिंगणात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेदरम्यान शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून झालेला असहकार लक्षात घेऊन युतीचे नेते सावध झाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचाराच्या स्पष्ट सूचना शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पालकमंत्री शिंदे केळकर यांच्यासाठी ठाण्यात उतरणार आहेत. शिवसेनेच्या एका गटातील नाराजीचा फटका भाजपला बसू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या ठाणे विधानसभा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद वाढू लागली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. नौपाडा, विष्णुनगर, चरई हा संपूर्ण पट्टा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. या संपूर्ण पट्टय़ात भाजपचे नगरसेवक निवडून आल्याने हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या बोलणीत ठाणे शहर विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी असा या पक्षाचा आग्रह होता. मात्र, महापालिका क्षेत्रातील एकमेव जागा शिवसेनेला देण्यास भाजप नेते तयार झाले नाहीत. त्यामुळे शिवसेनेतील एक मोठा गट सुरुवातीपासून संजय केळकर यांच्या प्रचारापासून स्वतला दूर ठेवू लागला आहे.
संजय केळकर यांचा अर्ज दाखल करत असताना शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मिरवणुकीत फिरकले नाहीत. भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी देखील असहकाराच्या भूमिकेत दिसले. त्यापाठोपाठ झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसही शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. पालकमंत्री शिंदे यांना दूरध्वनी करून शिवसैनिकांची गर्दी जमविणे भाग पाडले. हा घटनाक्रम ताजा असल्याने भाजप आणि शिवसेनेचे नेते सावध झाले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत ठाण्याच्या रणधुमाळीत उतरण्याचा शब्द भाजप उमेदवार संजय केळकर यांना दिल्याचे वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडी क्षेत्रात शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांनी पूर्ण कसब पणाला लावले होते.
प्रकाश पाटील यांच्यासह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना पाटील यांच्यासाठी प्रचारात उतरण्यास शिंदे यांनी भाग पाडले होते. नेमके त्याच पद्धतीने ठाण्यातही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना केळकर यांच्या प्रचारात उतरण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या असून नौपाडा, विष्णुनगर पट्टय़ातील पक्षाचे माजी नगरसेवक, शहरप्रमुख, विभाग प्रमुखांना युतीसाठी राबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात युतीचे सरकार आल्यास शिंदे यांच्या पदरात महत्त्वाचे खाते पडेल, अशी आशाही शिवसैनिकांना दाखवली जात असून हा आदेश प्रमाण मानून पक्षाचे पदाधिकारी केळकर यांच्या प्रचारात सक्रिय दिसू लागले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे ठाण्यात स्वत केळकर यांच्यासाठी रॅली काढणार असून त्यासाठी शिवसैनिकांना शक्तिप्रदर्शन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती युतीमधील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
शिवसैनिकांना आवाहन
मुख्यमंत्र्यांच्या सभेत कमी गर्दी झाल्यामुळे युतीचे नेते सावध झाले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील युतीच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी स्वत खांद्यावर घेतली असून ठाणे शहरातील भाजप उमेदवारासाठी शिवसैनिकांनी प्रचारात झोकून द्यावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.