कल्याण – चक्कीनाका येथील बालिकेची निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणातील मारेकऱ्याला महिलांच्या ताब्यात द्या, अशी संतप्त महिलांची मागणी आहे. कायद्याच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. परंतु, संविधानाच्या चौकटीत राहून मारेकरी विशाल गवळी याला फाशी होईल यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व शासनयंत्रणा प्रयत्नशील राहील, अशी माहिती भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ यांनी गुरुवारी येथे माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चक्कीनाका येथील अल्पवयीन बालिकेच्या हत्याप्रकरणाची माहिती पोलिसांकडून घेण्यासाठी आणि बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आमदार चित्रा वाघ गुरुवारी कल्याणमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला. विशालने इतके घृणास्पद कृत्य केले आहे की त्याचा चौरंग्याच महिलांनी केला असता, पण कायद्याच्या चौकटीत ते बसणार नाही. त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून मारेकरी गवळीला फाशीची शिक्षा होईल यादृष्टीने आपण स्वता, स्थानिक आमदार सुलभा गायकवाड आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.

हेही वाचा >>>ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “

राज्यातील महिला, त्यांच्या मुली यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आहेत. कल्याणमधील घटनेवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. तशा सूचना त्यांनी कल्याणच्या पोलिसांना दिल्या आहेत. समाजात विकृत व्यक्ति अधिक प्रमाणात फिरत आहेत. अशा विकृतांना ठेचण्याची हीच वेळ आहे. विशालला फाशी होईल यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. जेणेकरून अशी कृत्य करण्यासाठी असे विकृत पुन्हा धजावणार नाहीत, असे आमदार वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शिळफाटा रस्त्यावरील संध्याकाळच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

पोलीस याप्रकरणाचा योग्यरितीने तपास करत आहेत. विशालजवळ मनोरुग्ण असल्याचे दाखले आहेत. हे दाखले त्यांना कोणी दिले. या आधारे त्याने न्यायालयातून जामीन मिळवला आहे. याप्रकाराने विशालचा खोटेपणा पोलीस, न्यायालयासमोर उघड झाला. हे मनोरुग्ण दाखले देण्याचे प्रकरण आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणणार आहोत. या प्रकरणात विशालच्या पाठीशी कोणीही बडा नेता असला तरी मुख्यमंत्री फडणवीस त्या बड्या नेत्याचा बंदोबस्त करण्यास पुरेसे आहेत. विशालला आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्याला फाशीच होईल यासाठी प्रयत्न केले जातील. बालिकेच्या कुटुबीयांच्या पाठीशी समाज, शासन आहे, असे आमदार वाघ यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla chitra wagh says that efforts are being made to have vishal gawli hanged kalyn news amy