कल्याण – उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बोलाचाली झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Video : राज ठाकरेंची पुन्हा एकदा टोलधाड, “यावेळी ठाणे – मुलुंड टेालनाक्यावर…”

या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात बोलाचाली झाली.यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींने दिली.

हेही वाचा >>> आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची चौकशी; राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी केली आश्रमशाळेची पाहाणी

गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. विस्तृत माहिती देण्यास पोलीस नकार देत आहेत. आमदार गायकवाड यांना पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले आहे. शहरप्रमुख गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार गायकवाड यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ganpat gaikwad firing at shinde group kalyan city chief mahesh gaikwad after dispute zws
Show comments