महाविकास आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना करताना सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रभाग रचनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे असा आरोप भाजपचे कल्याण पूर्व विभागाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. गणपत गायकवाड कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

“निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी जी मार्गदर्शक तत्त्वे पालिकेने घालून दिली होती, त्याचे उल्लंघन महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केले आहे. या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवक, उमेदवारांचे प्रभाग सोयीप्रमाणे करून घेतली आहेत. या कामासाठी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांचाही उपयोग करून घेतला आहे,” अशी टीका गायकवाड यांनी केली.

New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Loksatta Lokrang Republic Day 2025 Emergency Tihar Jail Irshad Kamil
‘एकता का वृक्ष’ वठला काय?
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Forest Minister Ganesh Naik Challenges
लोकजागर : नाईकांसमोरचे आव्हान!
Nitin Gadkari
Nitin Gadkari: “… तर मीच बुलडोझर घेऊन येतो”; नितीन गडकरींचा सज्जड दम, कारण काय?

“सत्ता हातात आहे म्हणून तुम्ही पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला आणू शकत नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला. “भाजपमधून जे नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले आहेत ते नगरसेवक आयाराम गयाराम वातावरणातील होते. त्यांच्याकडे पक्षनिष्ठा नव्हती. ते ज्या मूळ पक्षातून आले होते त्या पक्षात ते निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे आमदार गायकवाड यांनी सांगितले.

Story img Loader