कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि खासदार शिंदे समर्थक शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा आता एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत पोहोचला आहे. आमदार गणपत गायकवाड यांची यांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करण्याची गरज आहे. अशी टीका शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे.

आपण शासन स्तरावरून मंजूर करून आणलेल्या विकास निधीचे श्रेय आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्वेतील त्यांचे समर्थक घेत असल्याचा आमदार गायकवाड यांचा आरोप आहे. या आरोपाला उत्तर देताना शहर प्रमुख गायकवाड यांनी मागील पंधरा वर्षात आमदार गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागाचे नेतृत्व केले. या कालावधीत त्यांनी कोणती विकास कामे केली. या उलट हा भाग विकासापासून वंचित ठेवला, अशी टीका केली आहे. राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजप मध्येच कल्याण पूर्व भागामध्ये कलगीतुरा रंगल्याने स्थानिक युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कल्याणमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटापुढे भाजपाचे काही चालत नाही.

dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

हेही वाचा >>> “स्वार्थासाठी मराठा समाजाचा वापर करणे सोडून द्यावे अन्यथा…”, हसन मुश्रीफांना ठाकरे गटाचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचा भाजपाचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. तसेच कल्याणच्या भाजपच्या शनिवारच्या कार्यक्रमात आमदार गायकवाड यांनी ‘ तुमचा धनुष्यबाण कसाही असो, त्याला आता आमचे रॉकेटही पुरेसे आहे,’ अशी टीका शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा नामोल्लेख टाळून केली होती. शिवसेनेचे गुंड पदाधिकारी पोलीस संरक्षणात फिरतात. त्या पोलिसांचा लोकांच्या संरक्षणासाठी उपयोग करा, अशी मागणी आपण शासनाकडे केली असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले होते. त्या टीकेचा महेश गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला.

हेही वाचा >>> ‘गोकुळ’ मोडण्यासाठी ‘अमूल’चे आक्रमक कारस्थान; मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नाही तर, सायको टेस्ट करा, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की षंढ होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणणारे आमदार गायकवाड यांच्यावरही कितीतरी गुन्हे दाखल आहे. पोलिस संरक्षणाबद्दल बोललात तर आमदार गायकवाड यांच्या दोन्ही मुलांना पोलिसांचे संरक्षण आहे. त्यांची मुले काय करतात. पोलिस तर त्यांच्या घराबाहेर रखवालदारासारखे बसलेले असतात. केबल फुकट द्यायची आणि निवडून यायचे हे आमदारांचे काम आहे. धनुष्यबाण हा तर आमचा स्वाभिमान आहे.

हेही वाचा >>> Ganesh Chaturthi: कल्याण-डोंबिवलीत ४४ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा

धनुष्यबाणावर टीका करू नका. तुमचे रॉकेट जनता कोणत्या जागेत पुरून टाकील हे सांगता येणार नाही., असे प्रत्युत्तर महेश गायकवाड यांनी दिले आहे.  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विकास नाही तर फक्त भ्रष्टाचार झाला आहे. कल्याण पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीचे भूमिपूजन तीन वेळा झाले. अखेर खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने हे स्मारक उभारणीचे काम सुरू होत आहे. खोटेनाटे आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गायकवाड यांचा हा प्रयत्न आहे. आमदार गायकवाड युतीत काडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही युती धर्म पाळतोय आणि पालन करत राहणार, असेही शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केले आहे.

Story img Loader