उल्हासनगर: उल्हासनगर चे भाजप आमदार कुमार आयलानी यांचे पुत्र धीरज आयलानी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती आयलानी यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. धीरज आयलानी हे कुमार आयलानी यांचे पुत्र असले तरी त्यांची उल्हासनगर शहरात उद्योजक म्हणून ओळख होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुमार आयलानी यांच्या राजकीय कारकिर्दीत धीरज यांचीही त्यांना मोठी साथ होती. धीरज यांच्या अकाली निधनाने आयलानी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प तीन येथील सपना गार्डन परिसरात असलेल्या आयलानी यांच्या निवासस्थानाहून धीरज आयलानी यांची अंत्ययात्रा निघेल. तर शांतीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती आयलानी यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla kumar ailani son dhiraj ailani passes away zws