ठाणे : महापालिकेत काही मग्रुर आणि मस्तवाल अधिकाऱ्यांना वेळीच चाप लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत शहरातील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच ध्वनीफितमधील संभाषण दुदैवी आणि संतापजनक असून त्याची चौकशी करावी आणि ते खरे असेल तर महेश आहेर यांना निलंबित करावे, अशी प्रतिक्रीया केळकर यांनी आव्हाड प्रकरणावर व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांतील नागरिकांना भेडसावत असलेली पाणी पुरवठा तसेच इतर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांबाबत तत्कालीन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्याकडे दिड वर्षांपूर्वी तक्रार केली होती. या बेकायदा बांधकामांचे पुरावे पेनड्राईव्हच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला दिला. त्यात बेकायदा बांधकामे सुरू असतानाची काढलेली छायाचित्रे होती. तरीही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, अशी खंत व्यक्त करत लकी कंपाउंड इमारत दुर्घटनेसारखी घटना घडल्यानंतर डोळे उघडणार का, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!
Ajit pawar on maharashtra government formation
Ajit Pawar : महायुतीचं ठरलं! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Sanjay Shirsat on Eknath Shinde
‘एकनाथ शिंदे फकीर टाईप माणूस’, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? या प्रश्नावर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
Government orders closure of ministry work after Eknath Shinde resigns print politics news
मंत्र्यांच्या दालनांना अखेर कुलूप; मंत्रालयातील कारभार गुंडाळण्याचे आदेश
pune helmet compulsory
पुणे: शहरात तूर्त हेल्मेट सक्तीच्या कारवाईचा बडगा नाही, जानेवारीत अंमलबजावणी करण्याचे पोलीस आयुक्तांचे संकेत
concreting work, Gaymukh Ghat roads, Gaymukh Ghat,
गायमुख घाट रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

हेही वाचा – डोंबिवली जवळील गोळवली रिजन्सी इस्टेट संकुलात दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट

हेही वाचा – डोंबिवलीजवळ निवृत्त लष्करी जवानाचा हवेत गोळीबार

ठाणे महापालिकेत काही मग्रुर आणि मस्तवाल अधिकारी आहे. या अधिकाऱ्यांची अशी भावना आहे की, आपले कुणीच काही करू शकत नाही, असे मत केळकर यांनी व्यक्त केले. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी बेकायदा बांधकामांसंबंधी दिलेल्या पुराव्याची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने आयुक्तांकडे करीत आहे. परंतु, अशी कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच येत्या उन्हाळी अधिवेशनात विधिमंडळ अध्यक्षाच्या दालनात अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader