आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्राहकांचे आंदोलन

ठाणे : येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणाऱ्या बांधकाम प्रकल्पासाठी विकासकाने दहा वर्षांपूर्वी ग्राहकाकडून सुमारे ३०० कोटी रुपये घेऊन त्यांना अद्याप घरे दिली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन केले आणि यानंतर ऑगस्टपासून बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. ग्राहकांना हक्काची घरे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा केळकर यांनी विकासकाला दिला आहे. 

हेही वाचा >>> तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

राजेश पटेल असे विकासकाचे नाव आहे. या विकासकाने २०१३ साली घोडबंदर मार्गावर तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात राज टॉवर हा गृहप्रकल्प उभारणीची घोषणा केली होती. या प्रकल्पातील सदनिकांची विक्री करत त्याने ग्राहकांकडून पैसे घेतले होते. अनेकांनी निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तर काहींनी कर्ज काढुन आयुष्यभराची पुंजी घरासाठी गुंतवली. घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल या आशेने सुमारे ५०० जणांनी साधारण २५० ते ३०० कोटींची रक्कम विकासकाला दिली. परंतु गेल्या दहा वर्षात या विकासकाने इमारतीची एक विटही रचली नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

या नागरिकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आमदार केळकर यांनी जाब विचारताच विकासकाने १५ मे २०२१ रोजी काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता विकासकाने केली नाही. यामुळे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून विकासकाविरोधात आंदोलन केले. यानंतर येत्या ४ ऑगस्टपासून बांधकामास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. दरम्यान विकासकाची गय केली जाणार नसून जोपर्यंत ग्राहकांना हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार केळकर यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>> जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे – पालकमंत्री शंभूराजे देसाई

ठाणे शहरात विकासकांकडून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शहरात लहान मोठ्या विकासकांकडून सुमारे पाच हजार ग्राहकांची फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. त्यांना हक्काचे घर मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

संजय केळकर आमदार, ठाणे शहर