ठाणे : लोकसभा निवडणूक जवळ आली असताना ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये धुसफूस वाढीला लागली आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या तिकीट सवलत योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलण्यात आल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शिवसेनेवर जाहीर टीका केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
ठाणे व कल्याण मतदारसंघ कोणाच्या पारडयात पडणार यावरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. असे असताना बुधवारी ठाण्यात महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेच्या उद्घाटन सोहळयावरुन जुंपल्याचे पहायला मिळाले. आपल्या मतदारसंघात सोहळा होत असताना आपल्याला डावलल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. ‘मुंह में मोदी और ठाण्यात भाजप बेनाम’ अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. टीएमटीमध्ये सवलत देण्याची मागणी आपणच केली होती, असा दावाही केळकर यांनी केला. तर हा कार्यक्रम महापालिकेचा नसून आपल्या पक्षाचा होता, असा दावा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी केला.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकात गुजराती भाषेत तिकीट ?
ठाण्यापाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघातही नाराजीनाटय रंगले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेतून महिलांना शिलाई यंत्र, घरघंटी वाटपाचा कार्यक्रम बुधवारी झाला. मात्र यामध्ये डावलल्याचा आरोप कल्याण-डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी केला. परिणामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी चक्की नाका येथील या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
विजय शिवतारेंच्या बंडामुळे कुरबुरी
बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर शिंदे गटात असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे ठाम आहेत. त्यांनी बुधवारी अजित पवारांवर जोरदार टीका केली. आपल्याला बारामतीत पाच लाखांहून अधिक मते मिळतील, असा दावाही त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाण्यात केली. २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने मतदान करताना डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान आहे, असा प्रश्न विचारला होता का, असा सवाल परांजपे यांनी केला. तर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना योग्य ती समज दिली असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला.
युतीचा धर्म पाळायची गोष्ट करायची आणि प्रत्यक्षात वेगळेच वागायचे हे योग्य नाही. आम्हाला अपमानित केलेले चालणार नाही आणि तुम्हाला ते परवडणारही नाही. – संजय केळकर, आमदार,
भाजप कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपच्या शहराध्यक्षांना दिले होते. आमदार केळकर यांना निमंत्रण देण्याचे राहिले. याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल. – नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना