ठाणे : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ गटनेते पदी निवड झाल्याने मुख्यमंत्री पदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ठाणे आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत एकमेकांना लाडू भरविले. तर, दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेत मात्र शुकशुकाट दिसून आला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीने विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता वर्तवीली जात होती. तर, भाजपचे सर्वाधिक आमदार निवडुन आल्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशीही चर्चा होती. मुख्यमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. परंतु या चर्चांना बुधवारी पुर्णविराम मिळाला. भाजप नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. गटनेते पदी निवड झाल्याने मुख्यमंत्री पदी त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील ठाणे आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत एकमेकांना लाडू भरविले. ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय परिसरात गाण्यांवर थिरकत आनंद व्यक्त केला. यानंतर एकमेकांना लाडू भरविले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला. बदलापूर शहरातही भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी जल्लोष केला. असे असतानाच दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेत मात्र शुकशुकाट दिसून आला. कल्याण डोंबिवली या शहरात उद्या, गुरूवारी जल्लोष करण्याचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Brigadier Amitabh Jha acting UN peacekeeping force commander passes away
व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
urged to Mumbaikars to join BEST Kamgar Sena-led protest against municipalitys stance
महापालिकेच्या भूमिकेचा निषेध! १६ डिसेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मुंबईकरांना आवाहन
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?
In the grand alliance government BJP gave important portfolios to those from other parties Mumbai news
भाजपमध्ये प्रस्थापितांना धक्का; अन्य पक्षांमधून आलेल्यांना महत्त्वाची खाती, वरिष्ठ नेत्यांना सूचक इशारा

राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले, त्याचवेळी आम्ही विजयाचा जल्लोष साजरा केला. तसेच उद्या महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असून त्याचा आम्हाला आनंद आहे.-नरेश म्हस्के,ठाणे खासदार, शिवसेना (शिंदे गट)

Story img Loader