लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शिर्डी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ‘राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?’ असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. या वक्तव्यावरून राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

आणखी वाचा-ठाणे लोकसभेवर भाजपचा दावा?

बुधवारी रात्री राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या नाद बंगला या निवासस्थानाबाहेर जमून घोषणाबाजी केली होती. गुरुवारी ठाण्यातील भाजप महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp protests outside jitendra awhads residence mrj