उल्हासनगर: डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वाद आता उल्हासनगर शहरापर्यंत पोहोचला असून शिवसेनेने बॅनर माध्यमातून भाजपाला डिवचल्यानंतर आता भाजपानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. ५० कुठे आणि १०५ कुठे अशा आशयाचा बॅनर लावून भाजपाने शिवसेनेच्या ताकदीची खिल्ली उडवली आहे. हा भाजपाच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस किंगमेकर असल्याचेही या बॅनरमधून सांगण्यात आले आहे. या बॅनरनंतर शिवसेना आणि भाजपात थेट संघर्ष पाहायला मिळतो आहे.

गेल्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहरातील एका भाजपा पदाधिकाऱ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात उघड वितुष्ट निर्माण झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे भाजपाच्या अनेक आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी छाती ठोकपणे सांगितले. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्याविरुद्ध शिवसेनेच्या वतीने विविध माध्यमांतून प्रतिक्रिया दिल्या गेल्या. त्यातच तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर छापून आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे या जाहिरातीवरून भाजपात अस्वस्थता पसरली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – ठाणे: मुंब्रा बाह्यवळण मार्ग अखेर सुरू

दुसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आणखी एक जाहिरात देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न झाला. मात्र भाजपाच्या वतीने यावर टीका केली गेली. उल्हासनगर शहरात दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या वतीने भाजपाला डिवचणारी जाहिरात बॅनरच्या माध्यमातून झळकवण्यात आली. या बॅनरला आता भाजपानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात शिवाजी चौकात भाजपाच्या वतीने भव्य बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर मध्ये ५० कुठे आणि १०५ कुठे असा खोचक सवाल शिवसेनेला विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – मनोज साने होता ‘Sex Addict’; ‘डेटिंग ॲप’ आणि पॉर्न व्हिडीओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

शिवसेनेची ताकद ही भाजपापेक्षा काही पटीने कमी आहे. त्यात भाजपाच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यात किंगमेकर असल्याचे या जाहिरातीतून ठळकपणे दाखवण्यात आले आहे. भाजपाकडून शिवसेनेच्या ताकदीची खिल्ली उडवणारे हे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

Story img Loader