युतीत कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता; बंडखोरांचा प्रभाव निकालावर दिसणार का, याकडेही लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यत भाजपची ताकद वाढत असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणेकर या दोघांपैकी कोणत्या पक्षाच्या पारडय़ात जास्त जागा टाकतात की अन्य पक्षांना अनपेक्षित यश देतात. याचा फैसला आज, गुरुवारी होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमध्ये गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असली, तरी प्रत्यक्ष निकाल हाती येईपर्यंत दुपार होण्याची शक्यता आहे. कल्याणमधील दोन्ही मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीचा युतीला फटका बसणार का, यासोबतच मनसेचे खाते उघडण्याची शक्यता वर्तवल्या जाणाऱ्या कल्याण ग्रामीणमध्ये नेमके काय घडणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे निकालानंतर मिळणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. यावेळी भाजपने शिवसेनेपेक्षा दोन जागा अधिक मिळवत जिल्ह्य़ात राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले होते. यंदा १८ पैकी प्रत्येकी नऊ जागांवर हे दोन पक्ष निवडणूक लढवत आहेत. मतदानानंतर आलेल्या अंदाजांनुसार निकालावर या दोन पक्षांचा वरचष्मा राहील असा अंदाज आहे. असे असले तरी पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोणता असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांत सरासरी ४७.९१ टक्के इतके मतदान झाले असून पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्य़ांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. मतदानानंतर जिल्ह्य़ातील कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होणार, याचे अंदाज वर्तविले जात आहेत. सर्वानाच निकालाची उत्सुकता लागली असून गुरुवार सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या कामासाठी सुमारे १२०० अधिकारी-कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने आणि अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चौस्तरीय सुरक्षा व्यवस्था

ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांतील १३ मतमोजणी केंद्रांवर चौस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. त्यामध्ये पहिल्या कवचामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ३० जवान, दुसऱ्या कवचामध्ये राज्य राखीव दलाचे जवान, तिसऱ्या कवचामध्ये स्थानिक पोलीस आणि चौथ्या सुरक्षा कवचामध्ये स्थानिक पोलिसांसह होमगार्डचे जवान असतील. शहापूर, मुरबाड आणि मीरा-भाईंदर या तीन  केंद्रांवर ६ उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ७५ साहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ६८५ पोलीस कर्मचारी, ३ दंगल नियंत्रक पथके, १ राज्य राखीव दलाची तुकडी, रेल्वे सुरक्षा दलाची एक कंपनी असा फौजफाटा असेल.

अशी होणार मतमोजणी..

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.