राज्यात बहुमताचे सरकार आहे. उद्या विरोधकांनी बहुमत सिद्ध करा अशी मागणी केली. तरी महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तेव्हा १६४ आमदारांचे संख्याबळ १८४ होईल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मंगळवारी ठाण्यातील पाचपाखाडी भागात माघी गणेशोत्सवात आमदार बावनकुळे हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे-विटावा पादचारी पुलाचे काम पूर्णत्वास, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला पुलाच्या कामाचा पाहाणी दौरा

राज्यात बहुमताचे सरकार आहे. उद्या विरोधकांनी बहुमत सिद्ध करा अशी मागणी केली. तरी महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. तेव्हा १६४ आमदारांचे संख्याबळ १८४ होईल. असा दावा बावनकुळे यांनी केला. नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये या असे म्हटलेले नाही आणि म्हणणारही नाही. जोपर्यंत सत्यजीत तांबे स्वतःहून भाजपमध्ये येण्याचे म्हणत नाहीत. तोपर्यंत यावर भाष्य नको असेही बावनकुळे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president mla chandrashekhar bawankule claim 184 mlas support maharashtra government zws