लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाणे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे मजबुत करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी जाहिर केली आहे. यामध्ये ३० जुन्या तर ७० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर, महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, अनुसुचित जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि भटके-विमुक्त संयोजक या पदांच्या नेतृत्वात बदल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यासह ठाणे जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचबरोबर भाजपने ठाणे जिल्हाध्यक्ष पदी संजय वाघुले यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यापाठोपाठ भाजपच्या प्रदेश पातळीवरून आलेल्या आदेशानुसार वाघुले यांनी ९० जणांची कार्यकारणी मंगळवारी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

आणखी वाचा-भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष मोहपे यांना हटविण्यासाठी कथोरे समर्थकांची मोहीम

जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन दादू पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा वसंत पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग, चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे यांची, खजिनदारपदी सुदेश खारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जुन्या कार्यकारणीत माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्याकडे ठाणे महिला मोर्चा अध्यक्ष पद होते. परंतु त्यांच्या जागी आता माजी नगरसेविका स्नेहा अंकुश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या कार्यकारणीत सारंग मेढेकर यांच्याकडे युवा मोर्चा अध्यक्ष होते. त्यांच्या जागी सुरज दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा यांना कायम ठेवण्यात आले आहे. जुन्या कार्यकारणीत सचिन केदारी यांच्याकडे ओबीसी मोर्चा अध्यक्षपद होते. त्यांच्या जागी सुरेश पाटील याची तर, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील भोपर डी मार्ट भागात महानगरचा घरगुती गॅस पुरवठा सुरू

कायदा प्रकोष्टच्या संयोजकपदी ॲड. मकरंद अभ्यंकर, प्रज्ञा संयोजकपदी निखिलेश सोमण, उद्योग संयोजकपदी शिशिल जोग, व्यापारी संयोजकपदी मितेश शहा, शिक्षक संयोजकपदी संभाजी शेळके, मच्छिमार संयोजकपदी अमरिश ठाणेकर, अध्यात्मिक संयोजकपदी अश्विनी पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजकपदी अनिल भदे, भटके-विमुक्त संयोजकपदी गजानन आंधळे, आर्थिक प्रकोष्टपदी सीए विनोद टिकमानी, कामगार संयोजकपदी मधुसुदन देसाई, सहकार संयोजकपदी ॲड. अलकेश कदम, दिव्यांग संयोजकपदी आनंद बनकर, वैद्यकीय संयोजकपदी डॉ. अपर्णा ताजणे, सोशल मिडीया संयोजकपदी अलोक ओक, स्लम प्रकोष्टपदी कृष्णा भुजबळ, सांस्कृतिक संयोजकपदी देवराज साळवी, आयुष्मान भारत संयोजकपदी कैलास म्हात्रे, एक भारत श्रेष्ठ भारत संयोजकपदी राजेश जाधव, फ्रेंड्स ऑफ बीजेपी संयोजकपदी दत्तात्रेय घाडगे, साऊथ इंडियन प्रकोष्ट संयोजकपदी सुकुमार शेट्टी, उत्तर भारतीय संयोजकपदी राजकुमार यादव, गुजराती संयोजकपदी राकेश कतीरा, ट्रान्सपोर्ट संयोजकपदी वसंत कराड, राजस्थानी प्रकोष्टपदी महेंद्र जैन, जैन संयोजकपदी राकेश जैन, क्रीडा संयोजकपदी राजेंद्र मुणनकर व सहसंयोजकपदी डॉ. हेता हरेश ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर ४५ जणांची कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader