तोडलेली भिंत आणि अनधिकृत कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाईंदर पूर्व भागात मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सुरू केलेल्या विकासकामावरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विकासकामाअंतर्गत बांधण्यात येत असलेली भिंत भाजप नगरसेवकाने स्वत:च तोडल्याने या नगरसेवकावर गुन्हा दाखल करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी सेना नगरसेविकेने केली आहे तर दुसरीकडे भिंत बांधण्याच्या आड शिवसेनेचा अनधिकृत कार्यालय बांधण्याचा डाव असल्याचा आरोप भाजप नगरसेवकाने केला आहे.

भाईंदर पूर्व भागातील आरएनपी पार्क परिसरातील एका मोकळ्या भूखंडाभोवती भिंत बांधण्याचे काम सुरू होते. भाजपचे नगरसेवक मदन सिंग यांनी जागेवर जाऊन त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वत:च ही भिंत तोडल्याने वाद निर्माण झाला आहे.

या ठिकाणी आधीपासूनच भिंत होती मात्र मधल्या काळात त्याची तूटफूट झाल्याने अनेक व्यसनी या जागेत जमा होत असत तसेच या जागेत मोठय़ा प्रमाणावर कचरादेखील साठत होता. या विरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तुटलेली भिंत पुन्हा बांधून या जागेवर मुलांसाठी खेळणी बसविण्याचे तसेच व्यायामशाळा बांधण्याचे काम महापालिकेकडून आपण मंजूर करवून घेतले आणि तसे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले होते अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांनी दिली. मात्र असे असताना भाजपचे नगरसेवक मदन सिंग आणि गणेश शेट्टी यांचा हा प्रभाग नसतानाही दादागिरी करून त्यांनी ही भिंत तोडली.

त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याने तसेच भाषिक वाद निर्माण केल्याने त्यांच्यावर आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी ढवण यांनी केली आहे. मदन सिंग यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. हा परिसर आपल्याच प्रभागात येतो. या ठिकाणी असलेल्या नाल्यावर आणि रहदारीच्या रस्त्यावर मध्येच भिंत बांधण्यात येत होती. भिंतीमुळे स्थानिकांच्या रहादारीचा रस्ता बंद होणार असल्याने रहिवाशांनी भिंत बांधण्यास विरोध केला होता आणि तसे आपल्याला पत्रदेखील दिले होते.

रहिवाशांचा विरोध असल्याने या ठिकाणी भिंत बांधू नये असे पत्र आपण महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही काम सुरूच ठेवण्यात आले होते. म्हणून ही भिंत तोडण्यात आली. भिंत बांधल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यालय सुरू करण्याचा डाव होता असा पलटवार सिंग यांनी केला आहे.