लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेल्या शिवा अय्यर या उमेदवाराला भाजपच्या एका कार्यकर्त्याने धमकी दिली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात उमेदवार अय्यर यांनी लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
indapur assembly constituency harshvardhan patil dattatray bharne pravin mane maharashtra vidhan sabha election 2024
लक्षवेधी लढत: तिरंगी लढतीत हर्षवर्धन पाटलांचा कस!
वक्फ मंडळ कायदा नरेंद्र मोदीच बदलणार; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा विश्वास; राहुल गांधींवर टीका
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा

मागील अनेक वर्ष शिवा अय्यर हे कल्याण लोकसभा निवडणूक लढवितात. ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असतात. यावेळीही अय्यर यांनी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. ते डोंबिवली पूर्वेतील सागाव भागात राहतात. उमेदवार असल्याने शिवा अय्यर आपल्या कार्यकर्त्यांसह विविध भागात प्रचारासाठी जातात. डोंबिवलीत अशाच एका भागात प्रचारासाठी गेले असताना शिवा अय्यर यांना भाजपच्या एका कार्यकर्त्याने अय्यर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंवर अजिबात टीका करायची नाही, अशी धमकी दिली.

आणखी वाचा-मोदींच्या सभेमुळे प्लास्टिक कचरा वेचकांचा चांदी

या धमकीमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याने शिवा अय्यर यांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरुध्द लेखी तक्रार केली आहे. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली आहे.या धमकीमुळे आपणास आता प्रचारासाठी बाहेर पडणे धोक्याचे वाटू लागले आहे. त्यामुळे आपणास पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अय्यर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

उमेदवार अय्यर यांना धमकी आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र आहे. मग त्यांनी कोणाच्या विरोधात बोलायचे नाही का, असे प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत. धमकी देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी अय्यर समर्थकांनी केली आहे.