दहशतवादी कटांवर आधारित कथानकाद्वारे मुलींमध्ये प्रबोधन करणारा `द केरला स्टोरी’ चित्रपट राज्यात करमुक्त करण्याची मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित असलेला `द केरला स्टोरी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाणे : फाशी देण्याच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण; ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण आहे. या माध्यमातून देशातील मुलींबरोबरच समाजाला दहशतवादाच्या एका नव्या अस्त्राची ओळख होत आहे. त्यातून मुलींनी सतर्क होऊन सावधगिरी बाळगल्यास भविष्यात मुलींची फसवणूक टळणार आहे, असा दावा डावखरे यांनी पत्रात केला आहे. राज्यात `द केरला स्टोरी’ चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य कुटुंबातील मुली व महिलाही हा चित्रपट पाहू शकतील. तरी राज्यभरात `द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Story img Loader