डोंबिवली येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील एका दूध डेअरीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करुन तिकिटांची प्रवाशांना चढ्या दराने विक्री केली जात होती. रेल्वे गुन्हे शाखेचे पथक आणि रेल्वे दलाच्या जवानांनी रविवारी या डेअरीत छापा मारुन तेथून एक लाख ६८ हजार रुपयांची ९४ तिकिटे जप्त केली. काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दूध डेअरीतून सुनील दुबे (३५) या इसमाला तिकीट काळाबाजार प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला आहे. नागरिकांची मूळ गावी, परप्रांतामधील गावी जाण्यासाठी आरक्षित रेल्वे तिकिटे काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. विशेष करुन कोकण, उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक लोंढा तिकिटे काढण्यासाठी आहे. रेल्वे आरक्षित केंद्रात गेल्यानंतर तिकीट खिडकी उघडल्यानंतर पहिल्या एक मिनिटात ९० हून, १०० हून अधिक रेल्वे तिकिटे आरक्षित झाल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता.रेल्वे प्रशासनाने रेल्वे तिकिटाचांचा काळाबाजार करणाऱ्या मध्यस्थांचे जाळे यापूर्वीच मोडून काढले आहे. तरीही आरक्षित तिकीट खिडकी उघडल्यानंतर पहिल्या काही मिनिटात तिकिटे आरक्षित होत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या होत्या.

हेही वाचा >>>अदानीच्या मुद्दय़ावर आंदोलन करणाऱ्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा बोध घ्यावा

अशाच एका प्रकरणाचा तपास करत असताना, रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाला डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील कामत मेडिकल स्टोअर्स दुकानासमोरील एका दूध डेअरीमध्ये रेल्वे तिकिटे काळाबाजारात विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी पाळत घेऊन खात्री केली. या दूध डेअरीत अचानक छापा टाकला. त्यावेळी दूध डेअरीत लांब पल्ल्याच्या गाड्यांची एक लाख ६८ हजार रुपयांची ९४ तिकिटे तपास पथकाला आढळून आली. या डेअरीतून सुनील दुबे या इसमाला पोलिसांनी अटक केली. एका तिकिटामागे ५०० ते एक हजार रुपये प्रति आसन प्रवाशांकडून दुबे वसूल करत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.रेल्वे पोलीस आयुक्त ऋषी शुक्ला यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत दुबे यांने किती रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केला आहे. याचा तपास गु्न्हे शाखेचे पथक करत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black market of train tickets from milk dairy in dombivli amy
Show comments