नौपाडा भागातील कै. वामनराव ओक रक्तपेढीच्या वतीने ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त १४ फेब्रुवारीला युवक आणि युवतींसाठी घंटाळी चौकात रक्तदान शिबीर होणार आहे. ‘क्षण प्रेमाचा जिवलगासाठी, थेंब रक्ताचा सर्वासाठी’ या संकल्पनेवर आधारित हा सामाजिक उपक्रम असेल. सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी सायंकाळी ५.३० ते रात्री ७.३० या वेळेत रक्तगट ओळख, रक्तगट आणि प्लेटलेट सूचीची नोंदणी होणार असल्याची माहिती रक्तपेढीचे कार्यवाह अतुल धर्मे यांनी दिली. या दिवशी तरुण-तरुणींनी रक्तदानासारखे अमूल्य कार्य करावे, हा या कार्यक्रमामगचा उद्देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा