ठाणे : भिवंडी येथे बुधवारी सायंकाळी पडीक इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाच वर्षे मुलाचा मृतदेह आढळला. हा मुलगा मंगळवार सायंकाळ पासून बेपत्ता होता. परिसरात खेळत असताना तो पाण्याच्या टाकीत बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडी येथील अन्सार नगर परिसरात मुलगा त्याच्या आई-वडील आणि बहिणी सोबत वास्तव्यास होता. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी आला नव्हता. या प्रकरणाची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
हेही वाचा…कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला, मधुचंद्रासाठी काश्मीर की मक्का मदिनेला जाण्यावरून वाद
शांतीनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्राकरण तपासले असता तो परिसरातील एका पडीक इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ खेळताना आढळून आला होता. बुधवारी पोलिसांनी पाण्याच्या टाकीत पहिले असता मुलाचा मृतदेह पोलिसांना तरंगत असल्याचे दिसले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.