कल्याण – येथील एका पडझड झालेल्या इमारतीत एका १३ वर्षाच्या मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. त्याचवेळी एका तरूणाचा मृतदेह कल्याण रेल्वे स्थानकाजवळील रुळावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून या घटना घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सिंडीकेट भागातील एका इमारतीमधून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी तेथे पाहणी केली. तेथे एका मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. महात्मा फुले पोलिसांनी तातडीने या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेतला. ती १३ जानेवारीपासून बेपत्ता होती, असे तपासात आढळले. या मुलीच्या मृतदेहा जवळ पोलिसांना दोन मोबाईल आढळले. त्यामधील एक मोबाईल मृत अल्पवयीन मुलीचा होता. तर दुसरा मोबाईल रेल्वे मार्गावर उडी मारून आत्महत्या केलेल्या तरूणाचा असल्याचे आढळले. संबंधित तरूण जालना भागातील रहिवासी आहे. प्रेमप्रकरणातून त्याने अल्पवयीन मुलीची हत्या करून दुसऱ्या दिवशी स्वत: आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. महात्मा फुले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

pune crime news in marathi
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे अपहरण, हडपसर पोलिसांकडून अपहृत वडिलांची १२ तासांत सुटका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Story img Loader