कल्याण– मुंबई ते हैदराबाद पवन एक्सप्रेसने प्रवास करताना कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील एका तिकीट तपासणीसाला एका प्रवाशाने मी रेल्वेचा कर्मचारी आहे, असे सांगून तिकीट दाखविण्यास नकार दर्शविला. तपासणीसाने त्या प्रवाशाचे रेल्वे ओळखपत्र तपासले. ते बनावट असल्याचे आढळले. तपासणीने या प्रवाशाला कसारा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या बनावट रेल्वे कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध

पुरुषोत्तम विजय सोनावणे (३०) असे या बोगस रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ तिकीट तपासणीस साकेत हरिकृष्ण शर्मा यांनी ही महत्वाची भूमिका बजावली. त्यांना कृष्ण कुमार, सुमीत कुमार, सचीन अहिरे या त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा >>> दोन्ही डॉक्टर लोकांची नस ओळखण्यात अपयशी, आ. प्रमोद पाटील यांची पालिका आयुक्त, खासदारांवर टीका

रेल्वे पोलिसांनी सांगितले, मुंबई ते हैदराबाद पवन एक्सप्रेस शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकातून सुटून कसारा दिशेने धावत होती. या एक्सप्रेसमध्ये मध्य रेल्वेचे तिकीट तपासणीस साकेत शर्मा प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. एस-१० डब्यातील प्रवाशांची तिकीट तपासणी करत असताना एका ३० वर्षाच्या प्रवाशाने मी रेल्वेचा कर्मचारी आहे, असे तिकीट तपासणीस शर्मा यांना सांगितले. शर्मा यांनी त्या प्रवाशाला रेल्वेचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. रेल्वेचे ते ओळखपत्र बनावट असल्याचे शर्मा यांच्या निदर्शनास आले.

शर्मा यांनी त्या प्रवाशाची डब्यातच कसून चौकशी केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. एक प्रवासी बनावट रेल्वे ओळखपत्राचा आधार घेऊन प्रवास करत आहे. हे लक्षात आल्यावर शर्मा यांनी तातडीने ही माहिती कसारा लोहमार्ग पोलिसांना आणि आपल्या वरिष्ठांना दिली.

हा प्रवासी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिकीट तपासणीस शर्मा आणि इतर प्रवाशांनी या बोगस प्रवाशाला रोखून धरले. कसारा रेल्वे स्थानक आल्यावर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी या प्रवाशाची चौकशी करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पुरुषोत्तम सोनवणे हा बोगस रेल्वे कर्मचारी हैदराबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. साकेत शर्मा यांच्या जागरुकतेमुळे एक बनावट रेल्वे कर्मचारी पकडल्याने वरिष्ठांनी शर्मा यांचे कौतुक केले. मागील काही महिन्यापूर्वी डोंबिवली-दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान, दिवा, कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे तिकीट तपाणीसांनी बनावट तिकीट तपाणीसांना अटक केली आहे. त्यांच्यावर डोंबिवली रेल्वे स्थानकात गुन्हे दाखल आहेत.