डोंबिवलीत मागच्या दोन महिन्यांपासून उच्छाद मांडणाऱ्या माकडाला अखेर वन विभागाला यश आलं आहे. सेवा ट्रस्ट आणि वॉर संघटना यांचाही यात मोठा वाटा आहे. बोनेट मकाक या जातीचं हे माकड आहे. प्राणी संघटनेच्या माहितीनुसार हे माकड रस्त्यावर खेळ दाखवणाऱ्या मदाऱ्याच्या तावडीतून सुटून शहरात या माकडाने उच्छाद मांडला होता. मदारी लोकांसह हे माकड राहिलं असल्याने त्या माकडाला लोकांची भीती वाटत नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवलीत माकडाचा धुमाकूळ

गेल्या दोन महिन्यांपासून हे माकड डोंबिवलीतल्या रस्त्यांवर फिरत होतं. लोकांच्या घरात शिरुन त्यांचे कपडे फाडणं, वस्तू तोडणे, लोकांच्या हातून खायच्या वस्तू पळवणे, फळं मिळत नसल्याने ते मिळेल्या त्या वस्तू खात होतं. आता या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. १५ दिवस जाळीचा सापळा लावून माकडाला पकडण्यात आलं आहे.

माकडाची दहशत

डोंबिवली शहरात या माकडाला खाण्यासाठी फळ मिळत नसल्याने हा माकड डोंबिवली परिसरातील इमारतीत प्रवेश करुन लोकांचे दरवाजे व खिडक्या वाजवत खाण्यासाठी मागायचा. हे माकडं आकाराने जाडजूड असल्याने लोक त्याला घाबरत होते. अनेकदा माकड खाली दिसल्यानंतर लोक पळून जायचे. त्याला खायला मिळत नसल्यामुळे माकडाने डोंबिवली परिसरामध्ये धुमाकूळ घातला होता.