कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील पालिका नियंत्रित बोरगावकरवाडी वाहनतळाचा ताबा पालिकेने घेतला आहे. या वाहनतळाचे तीन वर्षाच्या कराराने परिचालन करणारे ठेकेदार श्री समर्थ एन्टरप्रायझेस यांनी पालिकेला भरावयाच्या भाड्या पोटीची एक कोटी २८ लाख दोन हजार ४४० इतकी रक्कम पालिकेने वारंवार नोटिसा पाठवुनही पालिकेत भरणा केली नाही. त्यामुळे या ठेकेदाराचा ठेका रद्द करून या वाहनतळाचा ताबा पालिकेने घेतला.

अलीकडेच याच भागातील दिलीप कपोते वाहनतळाच्या ठेकेदाराने पालिकेचे भाड्याची रक्कम न भरल्याने त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून पालिकेने कपोते वाहनतळ ताब्यात घेतले आहे. याठिकाणी आता पालिकेचे कर्मचारी वाहनतळ चालविण्याचे काम करत आहेत. अशाच पध्दतीने बोरगावकरवाडी वाहनतळाच्या ठेकेदारावर पालिकेने कारवाई केली.

Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mumbai Municipal Corporation owes Rs 16500 crore to the government mumbai news
सरकारकडे मुंबई पालिकेचे साडेसोळा हजार कोटी थकीत; सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Kalyan-Dombivli water, amrit water channel,
कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
will demand to provide additional water storage from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad says Commissioner Shekhar Singh
…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

हेही वाचा – मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश

ज्या ठेकेदारांनी पालिकेच्या मालमत्ता घेतल्या आहेत. पण ते वेळेवर पालिकेला भाडे देत नाहीत अशा ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्या मालमत्ता पालिकेने ताब्यात घ्याव्यात, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे बोरगावकरवाडी वाहनतळ ताब्यात घेण्याची प्रक्रिया अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ, अधीक्षक जयराम शिंदे, लिपिक प्रशांत धिवर, प्रवीण घिगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.

बोरगावकरवाडी वाहनतळ पालिकेने नोव्हेंबर २०२३ मध्ये पे ॲन्ड पार्क या निकषाने मे. समर्थ एन्टप्रायझेसला तीन वर्षाच्या कालावधीसाठी चालविण्यास देण्यात आला होता. हे वाहनतळ ताब्यात घेतल्यानंतर सुरूवातीला ठेकेदाराने तीन महिन्याचे भाडे ५९ लाख २० हजार ९७६ रूपये पालिकेत भरणा केले. त्यानंतर ठेकेदाराने पालिकेत भाडे भरण्यास टाळाटाळ सुरू केली. हे भाडे भरावे म्हणून मालमत्ता विभागाने ठेकेदाराला वेळोवेळी नोटिसा दिल्या. त्याला ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – Varsha Gaikwad : ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड संतापल्या

बोरगावकरवाडी वाहनतळावर पुरेशी वाहने येत नसल्याची ठेकेदाराची पालिकेकडे तक्रार होती. मालमत्ता अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी बोरगावकरवाडी वाहनतळाची अचानक पाहणी केली. तेव्हा तेथील भुयारी वाहनतळात एक हजार दुचाकी वाहने उभी असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. ठेकेदार पालिकेला चुकीची माहिती देत आहेत याची खात्री पटल्यावर पालिकेने ठेकेदार श्री समर्थ एन्टरप्रायझेसचा ठेका रद्द करून, त्यांच्या पालिकेतील अनामत, इसारा रक्कम जप्त करण्याची कार्यवाही उपायुक्त मिसाळ यांच्या आदेशावरून सुरू करण्यात आली आहे.

मे. समर्थ ठेकेदाराने पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याने पालिकेने त्यांंना काळ्या यादीत टाकले आहे. त्यांना अन्यत्र कोठेही व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader