मुंबई, ठाण्यात राहत असलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने १ एप्रिलपासून बोरीवली-ठाणे-राजापूर ही नवीन एसटी बससेवा सुरू केली आहे.
बोरीवलीहून घोडबंदर रोड मार्गे ही बस ठाण्यातील खोपट आगारात पोहचणार आहे. येथून बेलापूर रस्त्याने पनवेल, पेण आणि मुंबई-गोवा महामार्गावरून ही बस कोकणाकडे धावणार आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणारी ही बस पहाटे ५ पर्यंत राजापूर येथे पोहोचेल, तर परतीसाठी रोज सायंकाळी ५.३० वाजता राजापूर येथून ही पुन्हा परत मुंबईकडे प्रस्तान करेल. या एसटी बसचे आरक्षण सुरू झाले आहे. ही निमआराम बससेवा असून प्रवाशांनी सदर बससेवेचा
लाभ घ्यावा, असे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा