कल्याण येथील पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत कोडीनयुक्त प्रतिबंधित औषधांच्या १९२ बाटल्या टिळकनगर पोलिसांनी दोन जणांकडून जप्त केल्या आहेत. या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या आठवड्यात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करून कोडीनच्या ४० बाटल्या जप्त केल्या होत्या.

गुंगी, नशा येण्यासाठी या प्रतिबंधित औषधाचा वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणात इरफान इनामुद्दीन शेख (३१), सोहेल हारून शेख (२३) यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार गौतम जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी हा प्रकार पोलिसांनी उघडकीला आणला.

Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Suresh Dhas
Suresh Dhas : “माणसं मारायला लागल्यावर त्याचं समर्थन करायचं का?”, वाल्मिक कराडची भेट घेतल्याच्या दाव्यावर सुरेश धस स्पष्टच बोलले
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”

हेही वाचा >>>आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल

पत्रीपुलाजवळील कचोरे गाव हद्दीत शिवमंदिराच्या पाठीमागील बाजूस प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या उघड्यावर विकल्या जात असल्याची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना समजली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे दोन इसम कोडीन औषधांच्या बाटल्या घेऊन उघड्यावर बसले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मानवी शरीरास अपाय करणाऱ्या सरकारने प्रतिबंधित केलेल्या कोडीनच्या १९२ बाटल्या पोलिसांना आढळल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीविना या औषधांची बेकायदा विक्री केल्याबद्दल पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात औषधीद्रव्य आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिका आढावा बैठक संपन्न

इरफान, सोहेल हे दोन्ही इसम पत्रीपुलाजवळील होम बाबा टेकडी, गोविंदवाडी रस्ता भागात राहतात.या औषधांची किंमत ४३ हजार रूपये आहे. औषध साठा पोलिसांनी जप्त केला आहे. हा साठा त्यांनी कोठुन आणला याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.साहाय्यक पोलीस निरीक्षक एच. डी. राऊत याप्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रतिबंधित औषधांच्या बाटल्यांचे उत्पादन हिमाचल प्रदेशात करण्यात येत असल्याचे या बाटल्यांवरील नोंदीवरून पोलिसांना आढळले. कल्याण परिसरात कोडीनच्या प्रतिबंधित बाटल्यांची विक्री वाढल्याने अंमली पदार्थांचे सेवन करणारे आता ही औषधे सेवन करतात की काय असा पोलिसांना संशय आहे. ही औषधे विक्री, खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचे आदेश आहेत.

Story img Loader