लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : उसने घेतलेले तीनशे रुपये परत केले नाही म्हणून दोनजणांनी एका अल्पवयीन मुलाला भर रस्त्यात नग्न करून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार कळव्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तौसिफ खानबंदे आणि सामिल खानबंदे या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर संबंधित घटनेचे चित्रीकरण प्रसारित करत सरकारवर टिका केली आहे.

Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray says Obstruction of projects so people will not support him
“उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांची अडवणूक, जनता त्यांना थारा देणार नाही…” देवेंद्र फडणवीसांची टीका
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

कळवा परिसरात पिडीत १७ वर्षीय मुलगा आई-वडिलांसोबत राहातो. सुमारे वर्षभरापूर्वी त्याने तौसिफ खानबंदे याच्याकडून ३०० रुपये उसने घेतले होते. परंतु त्याने तौसिफ याचे पैसे परत केले नाही. काही दिवसांपूर्वी तौसिफ याने त्या मुलाला रस्त्यात गाठले. तसेच त्याच्याकडील ‘ब्लुटूथ इयरफोन’ हे उपकरण काढून घेतले. पैसे दिल्यानंतर हे उपकरण परत करेल असे तौसिफने त्याला सांगितले. त्यानंतर तो मुलगा तौफिक याच्या घरी गेला. तौफिक नसताना त्याने ते उपकरण त्याच्या आईकडून मागून घेतले. याची माहिती तौफिकला मिळाल्यानंतर मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तौफिक त्याचा मित्र सामिल याच्यासोबत त्या मुलाच्या इमारतीखाली आला. त्याने त्या मुलाला खाली बोलावले.

आणखी वाचा-ठाणे शहरात रस्ते धुलाईला सुरूवात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पालिकेकडून अंमलबजावणी

दोघेही त्याच्याकडून उसने घेतलेले तीनशे रुपये मागू लागले. परंतु त्या मुलाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनीही त्याला मुलाला मारहाण करण्यास सुरूवात केली. तौसिफ याने मुलाच्या पँटचा पट्टा काढला आणि त्या पट्ट्याने पाठीवर मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोघांनी त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्न केले. त्या मुलाने परिसरातील एका घराबाहेर दोरीवर वाळत घातलेली ओढणी काढून स्वत:च्या अंगावर गुंडाळली आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर संबंधित घटनेचे चित्रीकरण प्रसारित करत या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात फक्त तीनशे रुपये परत दिले नाही म्हणून १७ वर्षीय मुलाला भर रस्त्यात निर्वस्त्र करून दोघांनी मारहाण केली. सर्वसामान्यांचे सरकार म्हणविणाऱ्या या सरकारमध्ये गोरगरिबाची व्यक्ती प्रतिष्ठा काहीच नाही का? अशी टिका अंधारे यांनी केली आहे.