आपल्या जवळील उद्योग उभारणी, यशस्वीतेसाठीची संकल्पना काय आहे. आपण ती प्रत्यक्षात आपल्या कौशल्याने कशी कृतीत उतरवू शकतो. उद्योगाची उभारणी करत असताना आपल्याला आलेल्या अडचणी, अपयश. या अडथळ्यांवर मात करत यशस्वीतेसाठी पुढचा प्रवास करणे हे उद्योजकतेमधील खरे भांडवल आहे, अशी माहिती ज्येष्ठ उद्योजक दीपक घैसास यांनी रविवारी येथे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे, पण…”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क ग्लोबलच्या मुंबई विभागातर्फे डोंबिवलीत रविवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात ब्राह्मण उद्योजकांच्या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ७०० हून अधिक ब्राह्मण उद्योजक उपस्थित आहेत. विचार, व्यापार आणि व्यवहार या त्रिसुत्रीवर आधारित या परिषदेत उद्योजक दीपक घैसास यांच्याशी पत्रकार उदय निरगुडकर यांनी ‘भारतीय उद्योगांमधील संधी-आव्हाने’विषयावर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा- ठाणे: मीरा भाईंदर परिवहन सेवेच्या १२ कर्मचाऱ्यांना स्थानिक दुकानदारांकडून बेदम मारहाण

उदयोग सुरू करताना नव उद्योजक आपल्या जवळील संकल्पनेची प्रभावी मांडणी करुन हळूहळू पाऊल टाकला की त्याला यशाचे अंदाज येत जातात. त्याप्रमाणे तो आपला ग्राहक शोधत उद्योग उभारणीसाठी काय भांडवल लागेल याचा विचार करू शकतो. या साखळीतून त्या उद्योगाची यशस्वी उभारणी होते. अलिकडे उद्योग सुरू करण्यापूर्वी आपल्या जवळील संकल्पनेचा विचार सर्वात शेवटी ठेऊन, मला उद्योगासाठी भांडवल कसे उभारता येईल या विचारात नवउद्योजक अडकून पडतो. उद्योग उभारणीत भांडवल उभारणी हा चौथा टप्पा आहे. तुमची संकल्पना आणि त्याची मांडणी हा पहिला टप्पा आहे, असे घैसास यांनी सांगितले.

हेही वाचा- ठाणे : ठाकरे गटाचे नरेश मणेरा अटकेत

उद्योग उभारणीनंतर आपण झटपट यशाच्या शिखऱावर कसे पोहचलो. हे यश पुढील यशातील मोठी अडचण असते. उद्योग हा अडथळे पार करत, अपयशाच्या ठोकरी खात कसा उभा केला आहे. यशाचे टप्पे कसे गाठले, हे अनुभव पुढील प्रवासात खूप महत्वाचे असतात. अपयशाशिवाय यशस्वी उद्योजकाची उभारणी होऊ शकत नाही. गुजराती, मारवडी उद्योजक असे टप्पे पार करुन नव्या जोमाने उभे राहतात. अशी मानसिकता अद्याप मराठी उद्योजकांची नाही, अशी खंत घैसास यांनी व्यक्त केली.

आताच्या नवशिक्षित मुलांमध्ये ज्ञान भरपूर आहे. प्रशिक्षण, कौशल्य नसल्याने कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यात, उद्योग उभारणीत ही मुले बाहेर फेकली जातात. उद्योग व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणा बरोबर असे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना कसे मिळेल यादृष्टीने नियोजन केले जात आहे. आरक्षणाच्या मागे न धावता आपल्या ज्ञान, कौशल्याचा वापर करुन बहुतांशी ब्राह्मण उद्योजक विदेशात स्वबळावर उद्योग, व्यवसाय सुरू करुन रोजगार निर्माण करत आहेत, ही खूप समाधानाची बाब आहे, असे घैसास म्हणाले.

हेही वाचा- दिव्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी सहाय्यक आयुक्त निलंबित; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली कारवाई

सुक्ष्म लघु उद्योगांनी आता आम्ही लहानच बरे या संकल्पनेतून बाहेर येऊन मोठे होण्याचा प्रयत्न करावा. येत्या काळात जनधन योजना, आधार, मबाईल क्षेत्रात खूप संधी आहेत. नवउद्योजकांनी या दृष्टीने पाऊल टाकावे, असे घैसास म्हणाले.

बँक सुरू करा

परिषदेच्या उद्घाटन सत्रात रिझर्व्ह बँकेचे संचालक देशातील चढत्या आलेखाचा आढावा घेऊन देशातील सहा कोटी २० लाख उद्योगांची सुक्ष्म वित्त बँक असावी, असा मनोदय व्यक्त केला. यावेळी उद्योजक श्रीपाद कुलकर्णी, संयोजक अरविंद कोऱ्हाळकर, मुकुंद कुलकर्णी, अशोका बिल्डकाॅनचे संजय लोंढे, अर्थतज्ज्ञ अशोक रारावीकर, अजय शेष, संजय खरे उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmin business network global organized a two day conference at dombivli by mumbai chapter dpj