डोंबिवली- ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात जाऊन चोरट्याने बुधवारी दुपारी मंदिरातील पितळी वस्तू चोरुन नेल्या आहेत. ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. दुपारच्या वेळेत मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बदलापुरात आढळला दुर्मिळ तपकिरी हरणटोळ; सर्पमित्रांच्या मदतीने केली सापाची जंगलात मुक्तता

भिकारी, गुर्दुल्ले यांनी हा प्रकार केला असण्याचा संशय पोलिसांना आहे. ९० फुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱामधील चित्रण तपासून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मंदिरात चोरी झाल्याचे गावातील रहिवासी संतोष चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. ९० फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे असल्याने या झाडांच्या सावलीत निवाऱ्यासाठी अनेक भिकारी, फिरस्ते, गर्दुल्ले येथे येतात. रात्रीच्या वेळेत त्यांचा मुक्काम याच भागात असतो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brass articles stolen from gamdevi temple in kachore village of thakurli zws