महावितरण कंपनीची वीज बिलं न भरल्याने पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू भागातील सुमारे तीस दूरध्वनी केंद्रांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने या भागातील सुमारे दहा हजार दूरध्वनी मोबाईल सेवा तसेच इंटरनेट सेवा खंडित झाली होती. याचा परिणाम तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणू संशोधन केंद्र, तटरक्षक दल, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील बँका व कार्यालय तसेच व्यापारी वर्गाला भोगावा लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात लोकसत्तामध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्रालयस्तरावर चक्र वेगाने फिरली व महावितरणला असलेली थकबाकीची रकमेचा भरणा सायंकाळ पर्यंत झाला. त्यामुळे सर्व संबंधित दूरध्वनी केंद्रांना विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर इंटरनेट, मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सर्व दूरध्वनी केंद्राना टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे काम सुरू झाले असून बीएसएनएलची दूरध्वनी सेवा पहाटे पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता दूरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.