शीळ रस्त्यावरील गोळवली गावा जवळील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात प्रवासी वाहतूक करण्यास ओला, उबर चालकांना स्थानिक रिक्षा चालकांनी बंदी घातल्याने रहिवासी हैराण आहेत. दररोज चढे प्रवासी भाडे दर देऊन रिक्षेने प्रवास करायचा कसा, असा प्रश्न आता रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. रिक्षा चालकांची एवढी मुजोरी सुरू असताना रिक्षा संघटना पदाधिहेही वाचा >>>कारी, पोलीस यंत्रणा या रिक्षा चालकांवर कारवाई करत नसल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>उद्योगमंत्र्यांनी टाकली धाड, टँकर लाॅबीवर केली कारवाई, वाचा कधी आणि कोठे ते….

डोंबिवली शीळ रस्ता परिसरात नव्याने अनेक नागरी वसाहती उभ्या राहत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानक हाच या रहिवाशांचा येण्याचा जाण्याचा मार्ग आहे. अशा गृहसंकुलामध्येही रिजन्सी अनंतम संकुलाप्रमाणे रिक्षा चालकांनी हक्कदारी दाखवून ओला, उबर चालकांना प्रवासी वाहतूक करण्यास मज्जाव केला तर स्थानिक रहिवाशांनी फक्त चढे भाडे दर देऊन प्रवास करायचा का, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. स्थानिक रिक्षा चालकांची ही वाढती मुजोरी आरटीओ, पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांनी मोडून काढण्याची जोरदार मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
स्थानिक रिक्षा चालकांचे चढे प्रवासी भाडे दर आहेत. त्यामुळे रहिवासी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला, उबर रिक्षा चालकांना प्रवासासाठी पसंती देत आहेत. यामुळे आमचे नुकसान होते म्हणून रिजन्सी अनंतम गृहसंकुलाच्या आवारात बाहेरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी येऊ नये म्हणून स्थानिक रिक्षा चालक दादागिरी करत आहेत, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

रिजन्सी अनंतममधून डोंबिवली रेल्वे स्थानकात एक प्रवाशाकडे रिक्षा चालक ८० ते ९० रुपये मागतो. या प्रवासासाठी उबल चालक ३० ते ४० रुपये आकारतो. १५ ते २० रिक्षा चालक एकावेळी ओला, उबर चालकाला घेरुन त्याला पुन्हा या भागात तू यायचे नाही अशी दमदाटी करतात. ओला, उबर चालकाने रिजन्सी अनंतमच्या मुख्य प्रवेशव्दारावरील रस्त्यावरच प्रवाशाला सोडावे, अशी तंबी रिक्षा चालक देतात.रिजन्सी अनंतम संकुलाच्या प्रवेशव्दारावर, संकुलाच्या आतील भागात आता रिक्षा चालकांनी नियमबाह्यपणे रिक्षा वाहनतळ सुरू केले आहेत. चालकांच्या या मनमानीची पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाणार आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

“रिजन्सी अनंतमधील रहिवासी परवडेल अशा रिक्षा, ओला, उबर वाहनातून प्रवास करतात. स्थानिक रिक्षा चालक त्यास भाडे मिळत नाही म्हणून विरोध करत आहेत. एका फेरीत स्थानिक रिक्षा चालक ८० रुपये भाडे मागतात. ते प्रत्येकाला परवडणारे नाही. ”-लता अरगडे,रहिवासी

“प्रवाशांना परवडेल आणि सोयीचा वाटेल अशा वाहनातून प्रवास करण्याचा अधिकार आहे. कोणीही रिक्षा चालक रिजन्सी अनंतम किंवा इतर भागात आमच्याच रिक्षेतून प्रवास करा म्हणून इतर प्रवासी वाहतूक वाहनांची अडवणूक करत असतील तर तक्रार आल्यास संबंधित रिक्षा चालकांवर कारवाई केली जाईल.”-विनोद साळवी,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullied by local rickshaw pullers in dombivli amy