लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली जवळील दावडी भागातील रिजेन्सी इस्टेटमध्ये राहत असलेल्या एका विकासकाच्या घरातून एका महिलेने दोन लाख ९४ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली आहे. या विकासकाने या चोरीप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अमित भास्कर म्हात्रे असे तक्रारदार विकासकाचे नाव आहे. ते रिजेन्सी इस्टेटमध्ये मध्ये राहतात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला आहे. अमित म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनारपाडा भागात राहत असलेल्या सुनीता रामेश्वर निकम (४५) या महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा… नोकरीच्या आमिषाने डोंबिवलीतील दोन महिलांची फसवणूक
पोलिसांनी सांगितले, विकासक अमित म्हात्रे यांनी त्यांच्या घरातील शयन गृहातील कपाटातील खणात दोन लाख ९४ हजार रुपयांची रक्कम ठेवली होती. घरात चोरी झाली नसताना पैसे चोरीला गेलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अमित यांनी सुनीता यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त करुन त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. हवालदार खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.