चार अज्ञात आरोपींनी ठाणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे. आरोपींनी पोलीस असल्याचं भासवून फिर्यादी महिलेचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहे. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेनं कोनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमाअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. यावेळी फिर्यादी महिला नाशिक महामार्गावरून ठाण्याच्या दिशेनं रिक्षाने प्रवास करत होती. दरम्यान, स्पोर्ट बाइकवर आलेल्या चार जणांनी फिर्यादी महिला प्रवास करत असलेला रिक्षा अडवला. यावेळी आरोपींनी बनावट ओळखपत्र दाखवत पोलीस असल्याचं भासवलं.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

तसेच येथून पुढे प्रवास करणार असाल, तर गळ्यातील दागिने काढून पाकिटात सुरक्षित ठेवा, असा सल्ला दिला. दागिने पाकिटात ठेवण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करत दागिने गायब केले. आरोपी घटनास्थळावरुन निघून गेल्यानंतर फिर्यादी महिलेनं आपलं पाकिट तपासलं. यावेळी पाकिटात दागिने नसल्याचं लक्षात आलं.

या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर, कोनगाव पोलिसांनी कलम ४२० (फसवणूक) आणि कलम १७० (सरकारी कर्मचारी असल्याचं भासवणं) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात आरोपी नेमके कोण होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी पोलीस असल्याचं भासवून दिवसाढवळ्या असा गुन्हा केल्यानं पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. या घटनेचा पुढील तपास कोनगाव पोलीस करत आहेत.