ठाणे : मालकीनीचे अश्लिल छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार खंडणी उकळणाऱ्या एका लेडिज टेलरला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. विशाल राठोड (४१) असे आरोपीचे नाव असून त्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिडीत ४९ वर्षीय महिलेचा वागळे इस्टेट भागात बुटीकचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी तिची ओळख विशाल राठोड याच्यासोबत झाली होती. विशाल हा महिलेच्या दुकानात डिझायनर कपड्यांचे शिवणकाम करण्याचे काम करत होता. त्याने पिडीत महिलेसोबत मैत्री केली होती. तसेच तिचे काही अश्लिल छायाचित्र, संदेश आणि चित्रीकरण विशाल याच्याकडे होते. काही महिन्यांपूर्वी विशाल त्याच्या सूरत या गावी गेला. तिथे गेल्यावर त्याने तिला तिचे अश्लिल छायाचित्र आणि चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. हे छायाचित्र मोबाईलमधून काढून टाकण्यासाठी तो महिलेकडून खंडणी मागू लागला. महिलेने आतापर्यंत विशाल याला १ लाख १० हजार रुपये दिले होते. त्यानंतरही तो त्रास देत असल्याने पिडीत महिलेने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन तपास पथके तयार केली. विशालला अटक करण्यासाठी पोलिसांनी मुलुंड येथे सापळा रचला. तो मुलुंड येथे ३० हजार रुपयांची  खंडणी घेण्यासाठी आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, सिमकार्ड आणि खंडणीची रक्कम जप्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: By threatening to broadcast an obscene photograph of malikini srinagar police arrest ladies tailor who extorts extortion amy
Show comments