ठाणे – विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यात आलेला प्रचार मतदारांची आता डोकेदुखी ठरू लागला आहे. सुरुवातील राज्यशासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ येणारे फोन महिलांसाठी त्रासदायक ठरत होते. मात्र आता ज्या मतदारसंघाचा संबंध नाही अशा विविध मतदारसंघातील उमेदवारांचे देखील रात्री – अपरात्री येणारे फोन जिल्ह्यातील मतदारांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. यामुळे प्रचाराचा होणारा अतिरेक अत्यंत गैर असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचार संहितेच्या कालावधीत सर्वच प्रमुख पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी सर्वत्र जोरदार प्रचार मोहीम सुरू केली. विविध विकासकामांचे बॅनर शहरभर झळकवणे, पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चौका चौकात होणाऱ्या सभा, रस्त्यांच्या दुतर्फा झाडांना गुंडाळलेले पक्ष निशाणींचे लहान लहान फलक, भर दुपारी शांतता असताना गृहसंकुलांमध्ये मध्ये, निवासी भागांमध्ये प्रचाराचा भोंगा घेऊन फिरणाऱ्या रिक्षा यामुळे आधीच अनेक नागरिक उद्विग्न झाले आहेत. तसेच अनेक पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत की नाही यासाठी नागरिकांना प्रचार साहित्य वाटप करताना घरोघरी जाऊन फोटो काढण्याच्या सूचना स्थानिक उमेदवारांकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे देखील घरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आधीच संतापले आहेत. असे असतानाचा आता समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून प्रचार यंत्रणा राबविण्याचा धडाका सर्वपक्षीय मंडळींनी लावला आहे. मात्र आता हाच प्रचाराचा अतिरेक मतदारांना नको नकोसा झाला आहे.

हेही वाचा >>>सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका

अंबरनाथ, ठाणे, कल्याण, डोंबिवली या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र या भागांतील विविध उमेदवारांचे प्रचारार्थ फोन येत आहेत. दिवसांतून सातत्याने येणाऱ्या या फोनमुळे कामावर असलेले नागरिक, गृहिणी हैराण झाल्या आहेत. यामुळे सर्वांकडून आता या प्रचाराचा अतिरेकाबाबत तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे.

यंत्रणा नेमकी काय ?

आयव्हिआर (इंटरॅक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) नामक संगणकीय यंत्रणेमध्ये प्रचार करणाऱ्या कंपन्यांकडून नागरिकांचे संपर्क क्रमांक टाकण्यात येतात. तसेच यामध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ रेकॉर्ड करण्यात आलेले संभाषणही टाकण्यात येते. यानंतर ही यंत्रणा सर्व संपर्क क्रमांकावर फोन करून संभाषण ऐकवत असते. मात्र बहुतांश उमेदवारांकडून निश्चय विभाग आणि वेळ यात टाकली जात नसल्याने याचा त्रास आता इतर मतदारसंघातील नागरिकांना भोगावा लागत आहे.

हेही वाचा >>>भाजपचे कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर तडीपारीची कारवाई

प्रतिक्रिया

उत्तर महाराष्ट्रातील तसेच मुंबई आणि नवी मुंबई, पुणे येथील विविध पक्षांच्या उमेदवारांचे सातत्याने फोन येत आहेत. ज्या उमेदवारांचा आमच्या मतदारसंघाशी संबंध नाही असे फोन त्रासदायक ठरत आहे.- अश्विनी यादव, अंबरनाथ विधानसभा

आमचा मतदारसंघ हा कल्याण ग्रामीण आहे. मात्र मुंबई, नवी मुंबई येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ फोन येत आहेत.- महिला मतदार, कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling for campaigning of candidates from north west maharashtra to the voters of thane district amy