लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा, खडेगोळवली, खडकपाडा, डोंबिवली भागातील बेकायदा इमारती, चाळी तोडण्याची जोरदार मोहीम प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी हाती घेतली आहे. अशाच एका कारवाईत बुधवारी बहुचर्चित डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील एका बेकायदा इमारतीवर फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
justin trudeau accepts Khalistani supporters in Canada
Canadian PM Justin Trudeau: सर्वच हिंदू मोदी समर्थक नाहीत, कॅनडाच्या पंतप्रधानांची टीका; म्हणाले “आमच्याकडे खलिस्तानी…”
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील

सर्व प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामांच्या विरुध्द जोरदार कारवाई सुरू असताना डोंबिवलीतील ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे दोन महिन्यांपासून पालिकेकडे ३२ पोलिसांचा ताफा असताना, स्थानिक पोलीस ठाण्यातून पोलीस बंदोबस्त मिळत नाही. पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे, अशी तकलादू कारणे देऊन माफियांच्या १४ बेकायदा इमारतींचे संरक्षण करत असल्याच्या तक्रारी आयरे गावातील नागरिकांनी केल्या आहेत. अशा कामचुकार अधिकाऱ्याची आयुक्तांनी तातडीने उचलबांगडी करण्याची मागणी तक्रारदार तानाजी केणे, अंकुश केणे यांनी केली आहे.

हेही वाचा… राज ठाकरेंचा आजपासून ठाणे आणि पालघर जिल्हा दौरा

टिटवाळ्यात अ प्रभागात साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी गणेशवाडी भागातील चाळी, बारा चाळींच्या जोत्यांवर कारवाई केली. अधीक्षक नंदकिशोर वाणी, सर्व्हेअर सकपाळ यावेळी उपस्थित होते. जेसीपी. ब्रेकरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील बहुचर्चित गावदेवी मंदिरा जवळील सात माळ्याची बेकायदा इमारतीवर फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, अधीक्षक जयवंत चौधरी यांच्या पथकाने घाव घातले. उद्यान आरक्षणावरील ही इमारत तोडावी म्हणून वास्तुविशारद संदीप पाटील यांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मनसेचे आ. प्रमोद पाटील या इमारतीच्या विरोधात होते. ही इमारत तोडू नये म्हणून अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता, असे पालिकेतील चर्चेतून समजते.

हेही वाचा… सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर डोंबिवलीत शिवसैनिकांचा जल्लोष

कल्याण पूर्व आय प्रभागात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आडिवली, ढोकळी भागात सुरू असलेल्या ११ बेकायदा चाळी, गाळे तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. आय प्रभागात दररोज बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू असल्याने वरिष्ठ समाधान व्यक्त करत आहेत. अशीच कारवाई ग प्रभागाचे साबळे यांना करण्यासाठी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आदेशित करण्याची मागणी आयरे गावातील नागरिक करत आहेत.

हेही वाचा… सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आनंद आश्रमाबाहेर जल्लोष

कल्याण पश्चिमेत ब प्रभागात साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी खडकपाडा पोलीस ठाण्या समोरील देसाईकर यांच्या १० बेकायदा गाळ्यांवर कारवाई केली. स्मार्ट सिटीतर्फे करण्यात येणाऱ्या रस्त्याला बाधित ठरणारी ट्री हाऊस शाळेची संरक्षक भिंत, लगतच्या सोसायटीची भिंत तोडण्यात आली.