परदेशी श्वानांच्या लोकप्रियतेमुळे काही श्वान प्रजाती श्वानप्रेमींमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. या लोकप्रिय श्वानांच्या व्यतिरिक्त आदर्श असणाऱ्या काही श्वानांना पाहावी तशी फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. या श्वानांचा इतिहास जुना असला तरी जगभरात काही श्वान लोकप्रिय झालेले नाहीत. याच श्वानांपैकी आदर्श मानले जाणारे केन कोरसो सध्या जगभरात श्वानप्रेमींकडे पाहायला मिळत आहेत. रोमन साम्राज्यापासून या श्वानांचा इतिहास सापडतो. रोमन युद्धात केन कोर्सो हे श्वान वापरले जात होते. इटलीमध्ये या श्वानांना प्रचंड लोकप्रियता आहे. इटालियन मॅस्टिफ असेदेखील या श्वानांना संबोधले जाते. आजही इटलीमध्ये राखण करण्यासाठी या श्वानांचा वापर अधिकाधिक होताना दिसत आहे. वेगवेगळ्या रंगांत हे श्वान आढळत असल्याने श्वानप्रेमींसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. बहुतेक काळ्या रंगातील श्वानांना विशेष पसंती असते. अत्यंत हुशार आणि निर्भीड स्वभावाचे श्वान असल्यामुळे या श्वानांची कामातील उपयुक्तता मोठी आहे. त्यासाठी या श्वानांना वर्किंग डॉग म्हटले जाते. कोणतेही काम शिताफीने करण्याचे प्रचंड सामथ्र्य या श्वानांमध्ये आहे. कळपाचे रक्षण करणे, शिकार करणे, राखण करणे यांसारख्या कामात केन कोरसो श्वान आपली जबाबदारी उत्तमरीत्या बजावतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा