मुंब्रा येथील बाह्यवळण मार्गाजवळ गांजा आणि नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कीन मेमन आणि एका अल्पवयीन मुलीला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो ५० ग्रॅम गांजा आणि १ हजार १०० गोळ्या जप्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाह्यवळण मार्गाजवळील झेंडेवाला बाबा दर्गा परिसरात काही महिला अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून तस्कीन आणि एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे १ किलो ५० ग्रॅम गांजा आणि १ हजार १०० नशेच्या गोळ्या असा एकूण २५ हजार २९८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.