ठाणे : जर लोकांनी सत्ता दिली नाहीतर, लोकांनी निवडुण दिलेल्या सदस्यांना आमिष दाखवून बाजुला करून सत्ता हातात घ्यायची, हे सुत्र भाजप वापरत असून त्याचबरोबर ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून सत्ता काबीज करणे हे देशासमोरच गंभीर चित्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नसून त्याचबरोबर बिल्कीस बानो, केंद्रीय यंत्रणांचा वापर यासारख्या विषयांवरुन त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टिका केली. देशात पर्याय द्यायचा असेल तर सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. यापुढे सत्तेची जबाबदारी हाती घेणार नसल्याचे विधान करत पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून दिलेली आश्वासने आणि त्याची किती पुर्तता झाली, याची आकडेवारी पवार यांनी पत्रकारांसमोर मांडली. २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी अच्छे दिनची घोषणा केलेली. किंमती कमी होतील म्हणाले होते. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना जावणले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. त्यानंतरच्या निवडणुकीत अच्छे दिनचा विसर पडला आणि त्यांनी न्यू इंडियाचा विश्वास दिला.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयातील Thackeray vs Shinde सत्तासंघर्ष कधी निकाली निघेल? शरद पवारांनी थेट सांगितलं, “यासाठी काही इतके…”

आता २०२४ मध्ये ५ ट्रिलियन इकमॉनमी आम्ही करु असा विश्वास द्यायचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सुविधा, प्रत्येक घरात शौचालय, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, २४ तास वीज या सर्व आश्वासनांची १०० टक्के त्याची पूर्तता झाल्याचे दिसून येत नसून यासंबंधीची आकडेवारी त्यांनी मांडली. आज ज्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सुत्रे आहेत हे सगळ्या एका विचाराचे आहेत. लोकांना काही विश्वास देण्याच्या संबंधातील त्यांची भूमिका दिसत नाही. भाजपाकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे, असेही ते म्हणाले.

कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार नव्हते. तिथे काही लोक फोडले गेले. महाराष्ट्रात शिवसेनेचा एक वर्ग बाजूला केला गेला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार घालवण्यात आले. मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार काही लोकांना फोडून पाडले गेले. हे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. लोकांनी दिलेले सरकार फोडून सरकार हातात घ्यायची हे सूत्र भाजपा वापरत आहे. देशात, राज्यात पक्षाला संधी मिळेल असे त्यांना वाटत नाही म्हणूनच असे केले जात आहे, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : Thackeray vs Shinde in SC: शिंदे गटाच्या ‘पाच वर्ष निकाल लागणार नाही’ या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “याचा अर्थ…”

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणमध्ये भाजपचे सरकार नाही. महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात भाजपे सरकार नव्हते. ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार नाही. लोकशाही मार्गाने सत्ता मिळत नसेल तर माणस फोडायची, ईडीचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून सरकार मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या राज्यात सरकार नाही, त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्यांना सत्तेपासून दूर करण्याचा उपक्रम भाजपाने राबवला आहे, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना जितेंद्र आव्हाडांनी राज्यात ज्या पद्धतीने काम केले, ते पक्षाच्या आणि जनहिताच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल झाले आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांना टोला

महिला अत्याचारासंदर्भातील संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यांच्यावर बलात्कार केला, त्यांच्या मुलांसहीत नातेवाईकांची हत्या केली. त्यात सत्र न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना आजन्म ठेप कारावसाची शिक्षा दिली. असे असतानाही गुजरातच्या भाजपा सरकारने निर्णय घेऊन त्यांना सोडले. नुसतेच सोडले नाही तर त्यांचा जाहीर सत्कार केला. याचे मला आश्चर्य वाटते. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात महिलांना सन्मान देण्यासंदर्भातील भूमिका मांडली. ते ज्या राज्यातून येतात. त्याच राज्यातील त्यांच्याच विचाराच्या सरकारने न्यायालयीन शिक्षा सुनावलेली असतानाही आरोपींना मुक्त केले. पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या भाषणात महिला सन्मानाची भूमिका मांडली, त्याची प्रचिती गुजरातमधील निर्णयाने समोर आली आहे, असा टोला पवार यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.

हेही वाचा : शरद पवारांच्या टिकेला शिंदे गटाकडून प्रतिउत्तर

सत्तेची जबाबदारी घेणार नाही

२०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तुमचे नाव पुढे येत असल्याबाबत पवार यांना विचारले असता, मी आता ८२ वर्षांचा आहे. मोरारजी देसाई हे ८२ व्या वर्षी पंतप्रधान झाले, तो कित्ता मी चालवू इच्छित नाही. त्यामुळे आता सत्तेची जबाबदारी घेणार नाही. परंतु या देशासमोरचे प्रश्न आणि सामान्य लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना हातभार लावावा, याबाबत काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना टोला

ठाण्याने सुसंस्कृत नेतृत्व दिलेले आहेत. त्यात खंडू रांगणेकर, प्रभाकर हेगडे, पाटील यांच्या नावाचा उल्लेख होतो. ही सर्व मंडळी समाजातील एक विशिष्ट विचारधारा घेऊन एक विशिष्ट दर्जांनी समाजकारण, राजकारण करीत होती. हीच ठाण्याची ओळख होती. हळूहळू तशीच स्थिती इथे होईल, यासाठी ठाणेकर काळजी घेतली आणि महाराष्ट्र मुक्त होईल, असा टोला पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

Story img Loader