डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील शंकेश्वरनगर येथे रविवारी सकाळी एका मोटार चालकाने बेदरकारपणे मोटार कार चालवून सोसायटीच्या आवारात भटकंती करत असलेल्या एका पाळीव श्वानाला जोराची धडक दिली. या धडकेत श्वान गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाळीव श्वानाच्या मालकाने तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जागेत बेकायदा गाळ्यांची उभारणी

हेही वाचा – डोंबिवलीत सोनारपाडा येथे मोटीराच्या धडकेत महिला गंभीर जखमी

प्राची राकेश पंडित या डोंबिवली पूर्व शंकेश्वरनगर भागात राहतात. रविवारी सकाळी तक्रारदार प्राची यांचे पती राकेश पंडित हे आपला पाळीव श्वान मॅडी यास घेऊन शंकेश्वरनगर सोसायटीच्या आवारातील मार्गिकेत फेऱ्या मारत होते. श्वान मोकळा असल्याने तो मौज करत होता. श्वानाची मोकळेपणाच्या वातावरणात भटकंती सुरू असताना अचानक भरधाव वेगाने एक एक्ससेंट कार (वाहन क्र. एमएच-०५-ईएल-४४७४) सोसायटीजवळील रस्त्यावर आली. तिने मॅडी श्वानाला जोराची धडक दिली. या धडकेत मॅडी श्वान गंभीर जखमी झाला. त्याचा काही क्षणात जागीच मृत्यू झाला. कार चालकाच्या निष्काळजीपणाने श्वानाचा मृत्यू झाल्याने प्राची पंडित यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात मोटारकार चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे या प्रकरणाचा तपास करत आहेत.