कळवा येथील खारेगाव टोलनाका भागात सोमवारी पहाटे एका मोटारीने अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवासी आणि वाहन चालकांनी मोटारीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मुंबई नाशिक महामार्गावरून अकलक शेख हे सोमवारी पहाटे कुर्ला येथून नाशिकच्या दिशेने मोटारीने जात होते. त्यावेळी मोटारीत त्यांच्यासोबत तीन प्रवासी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोटार खारेगाव टोलनाका येथे आली असता, अचानक मोटारीतून धूर येऊ लागला. त्यामुळे अकलक शेख यांनी तात्काळ मोटार थांबविली आणि मोटारीतून खाली उतरले. त्यानंतर त्यांनी प्रवाशांनाही सुरक्षित बाहेर काढले. अवघ्या काही क्षणात या मोटारीने पेट घेतला. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळाल्यानंतर आप्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजविण्याचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आली असली तरीही मोटारीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car suddenly catches fire in kalwa zws