लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाण्यात मेट्रो चार या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान, सुमारे १५ ते २० फुट उंचावरून एक सळई रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनात आरपार उभी शिरली. वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर ही सळई पडल्याने वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव वाचला. परंतु या घटनेमुळे मेट्रोच्या सुरू असलेल्या कामातील हलगर्जी दिसून आली आहे.

traffic jam three hours morning Mumbra bypass road Oil barrels bursted
शिळफाटा मार्गानंतर मुंब्रा बायपास ठरला नवी डोकेदुखी, तेलाचे बॅरेल फुटल्याने तीन तास झाली होती वाहतूक कोंडी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
wheel of ST bus running on Vasai Vajreshwari route came off
वसई वज्रेश्वरी मार्गावर चालत्या एसटीचे चाक निखळले
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
shani snan mahakumbh ticket price hike
विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

ठाण्यात सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यानुसार लाल बहादुर शास्त्री मार्गावरही प्राधिकरणाकडून विविध कामे सुरू आहेत. सोमवारी सकाळी या मार्गावरून वाहन चालक जितेंद्र यादव हे भांडुपहून तीन प्रवाशांना घेऊन कोलशेतच्या दिशेने जात होते. त्यांचे वाहन भारत पेट्रोल पंप येथे आले असता सुमारे १५ ते २० फुट उंचावरून एक लोखंडी सळई थेट वाहनात आरपार शिरली. ही सळई वाहन चालकापासून अवघ्या काही इंच अंतरावर पडली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Story img Loader