ठाणे : भिवंडी महापालिकेच्या परवानगीविना रस्ते खोदून बेकायदा मलनिस्सारण वाहिनी टाकण्याबरोबरच बेकायदा नळजोडणी घेतल्याप्रकरणी दोन जणांविरोधात नारपोली आणि निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बेकायदा बेकायदा मलनिस्सारण वाहिनी टाकण्याबरोबरच नळजोडणी घेणे दोघांना महागात पडल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भिवंडी येथील नागाव भागातील एका नागरिकाने पालिकेचा रस्ता खोदून मलनिस्सारण वाहिनी टाकली. त्यासाठी संबंधित नागरिकाने पालिकेची कोणतीच परवानगी घेतली नाही. त्याचबरोबर त्याने पालिकेच्या जलवाहिनीला छिद्र पाडून एक व्यासाच्या दोन बेकायदा नळजोडण्या घेतल्या होत्या. हि बाब निदर्शनास येताच महापालिका प्रशासनाने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संबंधित नागरिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

भिवंडी येथील निजामपुरा भागातील नदीनाका परिसरात एका नागरिकाने पालिकेच्या परवानगी विना रस्ता खोदून ७ बेकायदा नळजोडण्या घेतल्या होत्या. ही बाब सुद्धा निदर्शनास येताच पालिका प्रशासनाने निजामपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असू त्यालाही अद्याप अटक करण्यात आलेले नाही.