नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिलांनी लोकल प्रवासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. याची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निता परदेशीसह तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही या गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांना घेरत घोषणाबाजी केली होती.

हेही वाचा >>> कल्याण: बेकायदा,रखडलेल्या गृहप्रकल्पात कर्ज बुडाल्याने ‘सीबील’ अहवाल खराब; घरांची स्वप्ने बघणाऱ्या तरुणांना बँकांकडून कर्ज मिळेना

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

दोन दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडी आणि सहकारी पक्षांचा मोर्चा पार पडला. या मोर्चासाठी मुंबई आणि उपनगरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गेले होते. यात अंबरनाथ शहरातूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गेले होते. अंबरनाथ स्थानकातून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी लोकलमधून जात असताना त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. यात काही आक्षेपार्ह घोषणाही महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणाबाजीची चित्रफित सिमरन शेख नामक एका तरूणीने आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवला होता. ही बाब बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या एका पदाधिकाऱ्या निदर्शनास आल्याने त्याच्या वतीने अंबरनाथ पोलीसात तक्रार देण्यात आली होती.  अमन शेख या तरूणाने सिमरन शेख, महिला शहर संघटक निता परदेसी आणि स्नेहल कांबळे या तीन महिला पदाधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या तीन्ही महिलांना पदाधिकार्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावून योग्य तो समज दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

यापूर्वीही घोषणाबाजी

अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता वर्षानुवर्षे आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मेहनत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्थानिक राजकारणात सक्रीय असतात. तर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर याच डॉ. किणीकर यांना स्थानिक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी काही महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. किणीकर हे पालिकेत आले असताना त्यांना घेरून घोषणाबाजी केली होती. त्यानतंर हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.

Story img Loader